| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 30th, 2021

  देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भाजप वैद्यकीय आघाडीच्या आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन

  भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीण च्या द्वारा निर्मित आरोग्य कालदर्शिकेचं काल माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आदरणीय श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते प्रकाशन अनेक जेष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आलं

  यावेळी नागपूर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे, विदर्भ सहसंयोजक डॉ ज्ञानेश् ढाकुलकर, डॉ बारई, डॉ संजय अवचट उपस्थित होते.

  आरोग्य कालदर्शिकेची निर्मीती व संकल्पना डाॅ श्रीरंग वराडपांडे यांची असुन कालदर्शिकेत वैद्यकीय आघाडीचे वार्षिक शिबीर, वेबिनार, आरोग्य जनजागृती कार्यक्रम, सेवा क्लिनिक आदींची माहिती छायाचित्रांसहीत दिलेली आहे.या कालदर्शिकेसाठी, डॉ प्रीती मानमोडे, रोकडे ज्वेलर्स,आशा हॉस्पिटल कामठी, ऑरियस हॉस्पीटल, सेवनस्टार हॉस्पिटल, डॉ भावतकर, नुकलीयूस हॉस्पिटल, इको पॉईंट, सेंटर पॉईंट हॉस्पिटल, आदींचे सहकार्य लाभले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145