नागपूर : हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा गावाजवळील वेणा नदीत मासेमारी करताना एका 30 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तब्बल 20 तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
मृत तरुणाची ओळख स्वप्नील दीपक पाटील (वय 30, रा. रामेश्वरी) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील रविवारी सकाळी आपल्या तीन मित्रांसह कोतेवाडा येथील वेणा नदी परिसरात फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेला होता.
नदीकिनारी पोहोचल्यानंतर स्वप्नील मासेमारीसाठी नायलॉनचे जाळे घेऊन नदीत उतरला. मात्र मासे पकडण्याच्या प्रयत्नात तो नकळत खोल पाण्यात गेला आणि मित्रांच्या डोळ्यांसमोरच बुडू लागला. मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक मारत तातडीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष राठोड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वानाडोंगरी आणि मिहान अग्निशमन दलाचे जवान, गोताखोर आणि बोटीच्या सहाय्याने सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर सकाळी सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास स्वप्नीलचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे रामेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





