नागपूर : शहरातील तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यामुळे पोलिसांची चिंता वाढली असताना कपिलनगर पोलिसांनी एमडी ड्रग्जसह एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्याविरोधात यापूर्वीही ड्रग्ज तस्करीचे तीन गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस आता त्याच्याकडून ड्रग्ज पुरवठा साखळी आणि संपूर्ण नेटवर्कबाबत सखोल चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर परिसरात एक युवक एमडी ड्रग्ज घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून दोन ग्रॅमपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज आणि एक आयफोन जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख प्रियांशू गजभिये (वय 23), रा. चॅटर्जी लेआउट, सुगत नगर अशी झाली आहे. तो शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे.
तपासादरम्यान आरोपीविरोधात यापूर्वीही एमडी ड्रग्ज तस्करीचे तीन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक चौकशीत नशेच्या आहारी गेल्यानंतर तो अंमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रिय झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून जप्त करण्यात आलेली एमडी ड्रग्ज नेमकी कुठून आणली गेली होती आणि ती कोणाला पुरवली जाणार होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





