Published On : Wed, Jun 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; दोन अल्पवयीनांसह चार आरोपींना अटक

Advertisement

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असून त्यांच्या ताब्यातून १० चोरीच्या दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे १० आणि घरफोडीचा १ अशा एकूण ११ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने तहसील परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहानवाज शाह उर्फ गुलजार शाह, फैजान खान आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून विविध भागांतून चोरी करण्यात आलेल्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या.

तपासादरम्यान यशोधरा नगर, धंतोली, सीताबर्डी, कपिल नगर आणि कोराडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहन चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले. तसेच तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीप्रकरणातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

Advertisement

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी आणि घरफोडीतील १ लाख ३६ हजार रुपयांचा माल असा एकूण सुमारे ९ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.

प्राथमिक तपासात ही टोळी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. चोरीची वाहने नंतर गॅरेज चालक असलेल्या साथीदाराच्या मदतीने विक्रीसाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी वापरली जात होती. आरोपी शहानवाज शाह हा इलेक्ट्रिशियनचे काम करतो, तर दोन्ही अल्पवयीन मुले पेंटिंगचे काम करतात.

पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून इतर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges