Published On : Wed, Jun 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘ऑपरेशन टायगरची गरज नाही,आमदार स्वतःहून आमच्याकडे येतील; नागपुरात आमदार नरेंद्र भोंडेकरांचे विधान

Advertisement

नागपूर : शिवसेना (ठाकरे गट) आणि महायुतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठे विधान केले आहे. ठाकरे गटातील नाराज आमदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी कोणत्याही ‘ऑपरेशन टायगर’ची गरज नसून, पक्षांतर्गत नाराजीमुळे ते स्वतःहून महायुतीकडे येतील, असा दावा भोंडेकर यांनी केला.

नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना भोंडेकर म्हणाले की, ठाकरे गटातील काही नेत्यांची कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींशी वागणूक योग्य नसल्याची नाराजी आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्याबाबत वापरण्यात आलेली भाषा अयोग्य होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजी वाढत असून त्याचे परिणाम पुढील काळात दिसू शकतात, असे ते म्हणाले.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ठाकरे गटाच्या आमदार बैठकीबाबत बोलताना भोंडेकर यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांना समजून घेतले पाहिजे, असे मत व्यक्त केले. “खासदारांना आम्ही बोलावले नव्हते. त्यांना त्यांच्या पक्षात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणून ते आमच्याकडे आले. भविष्यात आमदार आले तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीमध्ये जागावाटपावर त्याचा परिणाम होईल का, असा प्रश्न विचारला असता, “ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे आले तरी महायुतीत जागावाटपाची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही,” असे भोंडेकर म्हणाले.

Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. “देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री असून ते चांगले काम करत आहेत. मात्र शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणे स्वाभाविक आहे,” असे त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची मते फुटल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. भंडाऱ्यात ३६ ते ४० मते फुटण्याची शक्यता आधीपासूनच होती, असा दावा त्यांनी केला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घातल्यामुळे नुकसान मर्यादित राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

“मला आणि काही नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची नाराजी होती. मात्र बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ती दूर झाली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची मते फुटली असतील, असे मला वाटत नाही,” असे भोंडेकर यांनी सांगितले.

भोंडेकर यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील संभाव्य नाराजी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges