Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Fri, Dec 11th, 2020

    आरामदायक प्रवासा करिता नागपूर मेट्रोचा उपयोग करावा : राधाकृष्ण बी

    – वाढती लोकसंख्या,वाढते शहरीकरण बघता सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्वाची

    नागपूर– ऍक्वा लाईन मार्गिकेवर काल पासून २ नवीन मेट्रो स्टेशन शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन नागरिकांच्या सेवेत सुरु झाले आहेत. तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री. राधाकृष्ण बी. यांनी महा मेट्रोच्या ऍक्वालाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ते रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

    नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. याचा जास्तीत नागरिकांनी उपयोग करावा असे मत श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरणराखण्यास देखील मदत होते.

    येणाऱ्या काळात वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता अतिशय सोपी आणि आरामदायक प्रवासा करिता मेट्रोचा उपयोग नागरिकांनी करावा. लास्ट माईल कनेटीव्हीटी अंतर्गत शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याकरिता महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका नियोजन करीत आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपण कमीत कमी व्यक्तींशी संपर्क साधून नागपूर मेट्रोने सुरक्षित आणि चांगला प्रकारचा प्रवास करावा असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

    Trending In Nagpur
    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145