नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षीय तरुणीने आपल्या सावत्र वडिलांवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि धमकावून गप्प ठेवण्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल ते १७ जून या कालावधीत आरोपीने तरुणीवर दोन ते तीन वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी सतत धमक्या देत असल्याने पीडिता भीतीच्या छायेत वावरत होती.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, या प्रकाराची कुणालाही माहिती दिल्यास तिच्या आईची हत्या करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे आईच्या जीवाला धोका निर्माण होईल या भीतीने ती दीर्घकाळ शांत राहिली आणि मानसिक त्रास सहन करत राहिली.
अखेर धैर्य एकवटत तरुणीने २० जून रोजी कोराडी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
कोराडी पोलीस आरोपीचा शोध घेत असून प्रकरणाच्या सर्व पैलूंवर सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





