
पोलिसांच्या माहितीनुसार, अताय रसूल उर्फ तालिफ (वय २६) हा संबंधित मदरशात धार्मिक शिक्षण देत होता. मध्य प्रदेशातून शिक्षणासाठी आलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने मदरसा व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
तक्रारीनुसार, आरोपीने विद्यार्थ्यांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदरसा व्यवस्थापनाने याची दखल घेतली. त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
पोलिस तपासादरम्यान आणखी काही विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्याने पीडितांची संख्या १० पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत आहेत.
अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...
ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews...
तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news
26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews...
चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate...
जाति आधारित जनगणना पर बावनकुले का बड़ा दावा #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news




