Published On : Tue, Jun 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बंगल्यात विषारी नाग; सर्पमित्राने केले सुरक्षित रेस्क्यू

Advertisement

नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या शासकीय निवासस्थान ‘स्नेह बंगला’ येथे सोमवारी विषारी नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराळे घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर नागाला सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

बंगल्याच्या मागील भागात गेल्या तीन दिवसांपासून साप दिसत असल्याने कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.

Gold Rate
June 22 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,800 /-
Gold 22 KT ₹ 1,35,300 /-
Silver/Kg ₹ 2,28,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शोधमोहीमेदरम्यान इन्व्हर्टरखाली लपलेल्या विषारी नागाने फणा काढत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभम पराळे यांनी धाडस आणि संयम दाखवत रेस्क्यू मोहीम सुरू ठेवली आणि अखेर नागाला सुरक्षित पकडले.

त्यानंतर नागाला सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील टीटीसी ट्रान्झिट सेंटरमध्ये नेण्यात आले. आवश्यक पंचनामा पूर्ण करून नाग वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement

वेळीच माहिती मिळाल्याने आणि तत्पर कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली. साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTROLOGY/WEEKLY RASHIFAL - Abhishek Soni EPISODE 7

ASTROLOGY/WEEKLY RASHIFAL - Abhishek Soni EPISODE 7

SEHAT KI BAAT - Nagpur Today News

SEHAT KI BAAT - Nagpur Today News

नागपुर में एमडी ड्रग्स के साथ इंजीनियरिंग छात्र गिरफ्तार #nagpurnews #crime #md #taskar #engineering

नागपुर में एमडी ड्रग्स के साथ इंजीनियरिंग छात्र गिरफ्तार #nagpurnews #crime #md...

RTMNU की डिग्री पर ही डिग्री का नाम गलत? #nagpurnews #rtmnu #nagpuruniversity #latestnews #news

RTMNU की डिग्री पर ही डिग्री का नाम गलत? #nagpurnews #rtmnu #nagpuruniversity...

बुलढाणा में मानसून की दमदार एंट्री.. #maharashtranews #latestnews #barish #mansoon

बुलढाणा में मानसून की दमदार एंट्री.. #maharashtranews #latestnews #barish #mansoon

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges