Published On : Mon, Jun 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चार महिलांची सुटका!

क्राइम ब्रँच युनिट-1 ची कारवाई; व्यवस्थापक अटकेत, दोन आरोपी फरार
Advertisement

नागपूर : नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत क्राइम ब्रँच युनिट-1 ने बजाजनगर परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा व्यवस्थापक अमन नामदेवराव वैद्य याला अटक करण्यात आली आहे. दोन मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयाग एन्क्लेव्ह येथे असलेल्या ‘मेफेअर लक्झरी स्पा सेंटर’मध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. सुरुवातीला दोन हजार रुपयांत व्यवहार ठरल्यानंतर खोलीत गेल्यावर पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर आधीपासून सज्ज असलेल्या पोलिस पथकाने छापा टाकला.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईदरम्यान स्पा सेंटरचा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या वर्धा येथील २८ वर्षीय अमन वैद्य याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो ग्राहकांना महिलांची उपलब्धता करून देत आर्थिक लाभ मिळवत असल्याचे समोर आले.

या छाप्यात मेघालय, बेंगळुरू, पुणे आणि आग्रा येथील चार महिलांची सुटका करण्यात आली. तसेच एका महिलेच्या माहितीनुसार सोनेगाव परिसरातील एका फ्लॅटमधून आणखी तीन महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

प्राथमिक तपासात स्पा सेंटर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलांना इतर राज्यांतून बोलावून देहव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. त्यांना मासिक मानधनासह प्रत्येक ग्राहकामागे स्वतंत्र कमिशन दिले जात असल्याचेही तपासात उघड झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, तीन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान स्पा सेंटरचे संचालन ओडिशा येथील सुशीलकुमार लोहारीवाल आणि कमलकुमार गोस्वामी हे करत असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील व्यवस्थापनाची जबाबदारी अमन वैद्य याच्याकडे होती. बजाजनगर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges