Published On : Mon, May 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

लंडन स्ट्रीटला नागपुर महानगर पालिकेचे स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल स्ट्रीट” नाव द्या -शिवसेना नेते किशोर तिवारी यांची मागणी

Advertisement

सिता नगर, खामला, भांमटी, जैताळा बाजार चौक मधील 5.5 किमी लांब रेल्वे ट्रॅकवरील ३४ लाख ४५ हजार चौरस फूट जमीन ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीकडून विनामूल्य मिळविल्यावर महापालिकेने “लंडन स्ट्रीट प्रकल्प” सुरू करून संपूर्ण जमीन केवळ भूखंड लिलावासाठी वापरलीव व लिलावही असा घेतला गेला की, सर्व महत्त्वाचे भूखंड केवळ फक्त एकुलते बिल्डर स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल यांनाच देण्यात येत आहे मात्र दोन दिवसापूर्वी या नागपुर महानगर मध्ये समांतर सत्ता चालविणाऱ्या प्रफूलभाऊ ने भाज्या, फळे आणि मांस विक्रेते यांची रस्त्याच्या कडेला प्लँटफॉर्म वर बसणाऱ्या सर्वांना हटवुन अतिक्रमण करून टिनाचे कंपाउंड अवैध पणे ठोकले यावेळी महानगर पालिकेचा संपूर्ण प्रशासन प्रफुल भाऊ चे आदेश प्रशासक देत आहे असे पालन करीत होता यावेळी प्रफुल भाऊ सिता नगर, खामला, भांमटी, जैताळा बाजार चौक मधील 5.5 किमी लांब रेल्वे ट्रॅकवरील ३४ लाख ४५ हजार चौरस फुटाचा मालकत्व आम्हास मिळाले व खासदार नितीन गडकरी यांचा यामध्ये सहभाग असल्याची खोटी माहीती देत होतं जर स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल ” यांचा दावा खरा असेल तर नागपुर महानगर पालिकेने लंडन स्ट्रीटला स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल स्ट्रीट” दयावे अशी मागणी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे

नागपुरात ‘लंडन स्ट्रीट’साठी मनपाची बिल्डरशी सौदेबाजी;खामला बाजार हटवला, झाडांची होणार कत्तल!

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

किशोर तिवारी यांनी खासदार नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करणारा “प्रफुल बिल्डर ” कोण आहे याची चौकशी केली असता देवाभाऊच्या मतदार संघात तर ‘विकीभाऊ’ शिवाय कोणीही काम करू शकत नाही तर हा सर्कस वाला “प्रफुल ” असावा मात्र त्याने आपले दुकान इंदोर ला बसविले आहे असे कळले मग मी आम्ह्चे “प्रफुल गुडधें ” तर नाही ना तर त्यांना काँग्रेसशी प्रामाणिक असल्यामुळे वाड्यावर प्रवेश नसल्याचे कळले ,मग हा नवीन समांतर सरकार चालविणारा स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल कोण “???? ह्या प्रश्नांचे उत्तर प्रभु अवतार देवा भाऊने दयावे अशी मागणी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.

लंडन स्ट्रीट प्रकल्प म्हणजे नागपूरकरांची फसवणूक, बिल्डरचा फायदा-प्रमुख मुद्दे

• वर्ष 2008 मध्ये नागपूर महानगरपालिकेने वर्धा रोड ते यशोदा नगर/राजेंद्र नगर या 5.5 किमी लांब रेल्वे ट्रॅकवरील ३४ लाख ४५ हजार चौरस फुटाजमीन ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीकडून विनामूल्य मिळवली, हे सांगून की या जमिनीवर नागरीकांसाठी बाजार, उद्याने, शाळा, दवाखाने यांसारख्या मूलभूत सुविधा उभारल्या जातील.

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात आजही एकही सुसज्ज बाजार नाही. भाज्या, फळे आणि मांस विक्रेते अजूनही रस्त्याच्या कडेला किंवा टाकाऊ जागांमध्ये बसतात. ही लज्जास्पद बाब आहे.

• सिता नगर, खामला, भांमटी, जैताळा बाजार चौक येथे बाजार उभारणे गरजेचे असताना, महापालिकेने “लंडन स्ट्रीट प्रकल्प” सुरू करून संपूर्ण जमीन केवळ भूखंड लिलावासाठी वापरली.

• लिलावही असा घेतला गेला की, सर्व महत्त्वाचे भूखंड केवळ एका बिल्डरस्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल याच्याच ताब्यात गेले.

• भूखंड क्रमांक 1, 1A (जयप्रकाश नगर मेट्रो रेल्वे स्टेशन शेजारी), 4 आणि 5 (खामला) याचे हक्क त्याला मिळाले.

• यासाठी आधी अस्तित्वात असलेले स्थानिक बाजार हटवून शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फ्लॅट स्कीम उभारण्यात आल्या.

• स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल अनेक गंभीर अतिक्रमण: सिता नगरमधील सार्वजनिक मैदानाचा वापर त्याने एक वर्षभर प्लॉट क्रमांक 1A वरील बांधकामासाठी केला.

• प्लॉट क्रमांक 4 वरील बांधकामासाठी सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली PU जमीन बेकायदेशीरपणे व्यापली आहे.

• प्लॉट क्रमांक 5 आणि आता प्लॉट क्रमांक 4 च्या तिन्ही बाजूंवरील फुटपाथसुद्धा अतिक्रमित केले गेले आहेत.

• ज्या कारणासाठी ही जमीन मिळवली गेली होती – मूलभूत नागरी सुविधा – त्याचे आज अस्तित्वच नाही.

• महापालिका मात्र कोट्यवधींचा लिलाव झाला असल्याचा दावा करत आहे.

• दुर्दैव म्हणजे, स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल यांनी महापालिकेला आजवर सुरक्षारक्कम, प्रीमियम अशा कोणत्याही अनिवार्य शुल्काचा भरणा करत नाही, आणि कोणत्यातरी कारणावरून वेळ काढत राहतो. तरीही प्रशासन त्याला पूर्ण सहकार्य करत आहे.

• अखेर संपूर्ण लंडन स्ट्रीट प्रकल्प केवळ एका बिल्डरच्या फायद्यासाठी वापरण्यात आला, आणि नागपूरकर नागरिक मूळ उद्देशापासून फसवले गेले.

• स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल नागपूर महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या अटींनुसार या कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी कर्ज घेण्यास पात्र नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांना हा निधी नेमका कुठून मिळतो आहे, याची सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे.

हा मतदार संघ देवेंद्र फडणवीस यांचा आहे “प्रफुल ” सर्रास खादर नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करीत आहे व हे दोन्ही नेते संघाचे स्वंयसेवक असुन चारित्र्य जपणारे व कंत्राटदार यांना दूर ठेवणारे असुन हे नेते फक्त विकास विकास करतात यामध्ये त्यांना पोटभरू वा कमिशन खोर असा देखावा निर्माण करणाऱ्या भामट्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे

Advertisement
Advertisement