नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राज्यभर वर्चस्व गाजवत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. नागपूर मतदारसंघातून भाजपचे राजीव पोतदार विजयी झाले असून विदर्भातील भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
18 जून रोजी झालेल्या निवडणुकीपूर्वीच ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
उर्वरित 11 जागांच्या मतमोजणीनंतर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, नागपूरमधून राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन, अमरावतीमधून प्रवीण पोटे आणि नांदेडमधून अमर राजूरकर यांनी विजय मिळवला. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले.
या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा नाशिक मतदारसंघाची ठरली. येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवला. त्यामुळे महायुतीला राज्यात केवळ एका जागेवर धक्का बसला.
अंतिम निकालानुसार भाजपने 11 जागा, शिवसेनेने 3 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. नागपूरसह विदर्भातील मतदारसंघांमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखत महायुतीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





