नागपूर : नागपूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. राजीव (राजू) पोद्दार यांनी दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा पराभव केला आहे.
मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार, डॉ. राजीव पोद्दार यांना 682 मते मिळाली, तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मते मिळाली. पोद्दार यांनी तब्बल 552 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
हा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून नागपूरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजपने ही जागा कायम राखत महायुतीची ताकद सिद्ध केली आहे.
नागपूरमधून आलेला हा पहिला महत्त्वाचा निकाल असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दुसरीकडे, प्रतिष्ठेच्या लढतीत झालेल्या या पराभवामुळे काँग्रेसला आत्मपरीक्षण करावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





