
भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, तर काँग्रेसचे अतुल लोंढे केवळ 130 मतांवर आटोपले. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने विजयाचे दावे केले होते, मात्र प्रत्यक्ष निकालाने वेगळेच चित्र उभे केले.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटातील अनेक मते भाजपच्या पारड्यात गेल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. त्यामुळे “मतदारांनी साथ सोडली की नेत्यांनी?”, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे.
नागपूरच्या राजकीय इतिहासात हा निकाल केवळ भाजपच्या विजयासाठी नव्हे, तर काँग्रेसच्या 130 मतांच्या धक्कादायक फुटीसाठी लक्षात राहणार आहे. या निकालाने काँग्रेसची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि आघाडीतील समन्वय यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने मात्र विरोधकांच्या मतांमध्येच सेंध मारत विजयाचा झेंडा रोवला आहे.
130 मतांची फूट… आणि काँग्रेसचा पराभव; नागपूरच्या राजकारणात याच निकालाची सर्वाधिक चर्चा रंगणार आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




