नागपूर : नागपूर जिल्ह्यात दोन मोठे औष्णिक वीज प्रकल्प कार्यरत असतानाही शहर व ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येचा मुद्दा आमदार विकास ठाकरे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना सतत वीजपुरवठ्यातील व्यत्ययांचा सामना करावा लागत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
यावेळी महावितरणकडे नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या दूरध्वनी, संदेश आणि तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची गंभीर बाबही सभागृहात मांडण्यात आली.
या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरकरांना अखंडित वीजपुरवठा आणि जबाबदार सार्वजनिक सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हा मुद्दा सातत्याने सभागृहात आणि शासनापुढे मांडत राहणार असल्याची भूमिका आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





