नागपूर : ऐषआरामाचे जीवन जगण्याची हाव आणि नशेच्या आहारी गेल्याने एका तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे नागपुरात उघड झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडवणाऱ्या सराईत वाहनचोराला नंदनवन पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १३ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची किंमत ९ लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विवेक ढाकणे (रा. अजनी) असे आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करणारा विवेक पत्नीने साथ सोडल्यानंतर नैराश्यात गेला आणि नशेच्या आहारी गेला. त्यानंतर पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने वाहन चोरी करण्यास सुरुवात केली.
नंदनवन परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. त्याच्या आधारे पोलिसांनी विवेकपर्यंत पोहोचत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नंदनवन, सक्करदरा, हुडकेश्वर, कोंढाळी, लकडगंज, हिंगणा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १३ वाहनचोरीच्या घटना केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपी चोरीच्या दुचाकी गहाण ठेवत असल्याचे समोर आले. त्या बदल्यात मिळालेल्या पैशांचा वापर तो हॉटेलमध्ये मौजमजा करण्यासाठी आणि नशेसाठी करत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १३ दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपीसोबत आणखी कोणी साथीदार होते का, याचाही शोध नंदनवन पोलीस घेत आहेत.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





