Published On : Wed, Aug 28th, 2019

मौदा बिनाकी झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुद्रांक शुल्कात 80 टक्के सवलत मंत्रिमंडळाची मान्यता

Advertisement

मुंबई: नागपूर येथील मौजा बिनाकी हाऊसिंग स्कीम मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुद्रांक शुल्कात 80 टक्के सवलत देण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टत राहणाऱ्या रहिवाश्यांना 1545 रू चौ. फुटांऐवजी 325 रू. चौ. फुटाप्रमाणे रजि‍स्ट्री करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी अशी विनंती शासनास केली होती.

शासनाने आज मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत ही शासनाच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेस सहायभूत ठरणार आहे. बिनाकी येथील नागनाथ बळवंत काळे यांच्या 13.81 हे.आर. वडिलोपार्जित जमिनीवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाश्यांना 1545 रू. रेडिरेकनरच्या दरा प्रमाणे मुद्रांक शुल्क दर न लावता 325 रू. प्रती चौ.फुट या प्रमाणे मुद्रांक शुल्काचा दर लावला जाणार आहे.