Published On : Mon, Jul 15th, 2019

जि.प. हिवरा हिवरी शाळेत वृक्षारोपण

रामटेक: तालुक्यातील हिवरा हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.याप्रसंगी हिवरा हिवरी ग्रामपंचायतचे सरपंच सुरेखा मलेवार,उपसरपंच विष्णू काठोके,ग्रा.पं.सदस्य नंदा नेवारे,बेबी कुंभलकर,रामा जांभुळे,अंगणवाडी सेविका शंकुतला आहाके,ग्रामसेवक तुकाराम पवार, मुख्याध्यापक राजश्री गायधने,लोकप्रिय प्रयोगशील शिक्षक तथा राज्य पुरस्कृत शिक्षक सचिन चव्हाण,संध्या राऊत, शालिक महाजन ,संगिता सोनटक्के आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.आंबा,करंजी,आवळा,कडूनिंब,चिंच अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.यावेळी विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढली.तसेच ‘झाडे लावा झाडे जगवा’ वृक्षसंवर्धन करण्याचा संदेश देणारी घोषणा ही दिल्या.