Published On : Mon, Jul 15th, 2019

कांद्री ला अपंग / दिव्यांग मार्गदर्शन मेळावा संपन्न

कन्हान: प्रहार अपंग क्रांती आंदोलन व्दारे ग्राम पंचायत कांद्री सभागृहात अपंग /दिव्यांग मार्गदर्शन मेळावात विविध शासकीय योजना, अनुदान विषयी माहीती, अपंगाची नोंदणी व समस्या निवारण बाबद मार्गदर्शन करण्यात आले .

रविवार (दि.१४) ला ग्राम पंचायत कांद्री सभागृहात दिनदुबळ्याचे कैवारी आमदार बच्चु भाऊ कडु यांच्या आदेशान्वये कांद्री येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करून अपंग / दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान, योजने संबंधित माहीती प्रहार रामटेक विघानसभा प्रमुख रमेश कारेमोरे , विदर्भ प्रमुख हनुमंतराव झोंटिग (वर्धा) , रविभाऊ मन्ने अध्यक्ष भंडारा जिल्हा, योगेश घाटबांधे सचिव भंडारा, सुनिल कहालकर (लाखनी) मनिष कुंजरकर (वर्धा), संगिताताई वांढरे (कांद्री), सर्वश्री प्रहार अपंग क्रांती आंदोलन पदाधिकारी हयानी शासकीय योजने अंतर्गत मिळणारे अनुदान, संत गाडगेबाबा घरकुल योजना , पासेस यांचे जी आर वाचुन दाखविले तसेच सर्वच नागरिकासोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले. आणि सर्व प्रथम अपंग /दिव्यांग मंडळीनी नगरपरिषद, ग्राम पंचायत येथे नोंदणी करावी अशी विनंती करण्यात आली.

तसेच आमदार बच्चुभाऊ कडु यांचे दिल्ली येथे दि. ८, ९ व १० ऑगस्ट च्या आंदोलन करिता चलो दिल्ली चे आवाहन करण्यात आले. तद्नंतर नवनियुक्त सहयोगी संघटक अरूण मस्के कांद्री, रमेश हुड टेकाडी, प्रविण शेंडे कन्हान, हरिष सहारे , संजय कुंभल कर खंडाळा, शंकर पोटभरे निमखेडा, जयपाल भुते साटक, देवराव भारव्दाज आमडी, बेबीकांता सोनटक्के अरोली या सर्वाचे विदर्भ प्रमुख हनुमंत राव झोंटीग, रमेश कारेमोरे , संगिता वांढरे स्वागत करून अभिनंदन केले. मेळाव्यास धनराज कारेमोरे, राहुल टेकाम, महेश झोडावणे, नरेश हिंगे , नेवालाल सहारे, देविदास तडस, पंढरी सरोदे, प्रकाश ढोके, किशोर बावने, प्रितेश मेश्राम, प्रयास ठवरे, उमेश महाजन, वामन देशमुख, वसंता राऊत, नरेश शेळके , बादल विश्वकर्मा , सह मोठय़ा संख्येने अपंग /दिव्यांग, नागरिक उपस्थित होते.

– एम व्ही रहाटे कन्हान – ७०२०८६२७८२