Published On : Mon, Jul 15th, 2019

कांद्री येथे ३३कोटी वृक्षलागवड अंतर्गत कार्यक्रम संपन्न

Advertisement

रामटेक: रामटेक तालुक्या अंतर्गत असलेल्या कांद्री येथे शतकोटी वृक्षलागवड अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रम राबविण्यांत आला.

जि. प. शाळा कांद्री द्वारा आयोजित विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यांत आली. हातात झाडे लावा झाडे जगवा,कावळा म्हणतो काव काव माणसा माणसा झाड लाव.अश्या घोषवाक्यांचे फलक व बॅनर घेवून विद्यार्थ्यांसह सरपंच परमानंद शेंडे,उपसरपंच मंजीत बहेलिया, समाजसेवक नागसेन भरणे शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्रावण ताकोद सह शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमांतर्गत ग्रा.पं.परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा व अंगणवाडी मैदानात वृक्षारोपण करण्यांत आले. याप्रसंगी आयोजित समारंभात सरपंच परमानंद शेंडे यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. प्रास्ताविक माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांनी दिली. याप्रसंगी नागसेन भरणे व उपस्थित ग्रा.पं सदस्य,कमल रौतेल,विकी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला ग्राम विकास अधिकारी न.शा.गाडगे, ग्रा पं सदस्य लक्ष्मी इरपाते,वच्छला येलूरे आरोग्य सेविका पी.पी.चांदेकर, भारत चावरे, संसाधन शिक्षक कु.रजनी मानकर निलिमा डेकाटे,यांची उपस्थिती लाभली.संचालन शिक्षक राहूल मानेकर यांनी तर शिक्षिका ज्योती जांभुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले,अंगणवाडी सेविका सुजाता नागदेवे,मदतनीस संगीता मेश्राम ,ओमकार मुळेवार,सह ग्रा.पं कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. ग्रा.पं कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यांत आला.वृक्षसंगोपणाचा संकल्प या वेळी उपस्थितांनी घेतला.