नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का रेल्वे परिसरात एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
मृताची ओळख शांतिनगर येथील लाल नगर परिसरातील रहिवासी अब्दुल रहमान ऊर्फ अब्दुल रज्जाक (वय 30) अशी झाली आहे. सोमवारी सकाळी रेल्वे रुळांजवळ एका युवकाचा मृतदेह पडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी लकडगंज पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. श्वानपथक व तांत्रिक तपासाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने राहुल उईके, परमेश्वर ऊर्फ पप्पू संतोष पटेल आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत मृतक आणि आरोपींमध्ये जुना वाद असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून दोन्ही गटांमध्ये तणाव सुरू होता. तसेच चोरीच्या प्रकरणातून मिळालेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या वाटणीवरूनही वाद निर्माण झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
याशिवाय, घटनेच्या एक दिवस आधी मृतकाने आरोपीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आणि कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी उशिरा दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद झाला. त्याचेच पर्यवसान हल्ल्यात झाले असून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून अब्दुलची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून खुनामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी तपास सुरू आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





