Published On : Sat, May 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; ‘मेलोडी’ वाटत केंद्र सरकारवर साधला निशाणा

महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीविरोधात व्हरायटी चौकात निदर्शने
Advertisement

नागपूर : शहरातील व्हरायटी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटत महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य केले.

यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले होते. हातात केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी असलेल्या फलकांसह त्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच नागरिकांमध्ये चॉकलेट वाटून सरकार जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांकडून हटवत असल्याचा आरोप करण्यात आला.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आणि वाढती बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, केंद्र सरकार या गंभीर प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

देशात महागाई आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे, हीच आमची मागणी आहे.– युवक काँग्रेस पदाधिकारी

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.