Published On : Fri, Apr 24th, 2020

अर्णव गोस्वामीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी युवक कांग्रेस चे सामूहिक निवेदन सादर

कामठी:- रिपब्लिक भारत न्यूज चॅनल चे कार्यकारी संचालक व संपादक अर्णव गोस्वामी यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास चॅनल वर ‘पुछता भारत’या कार्यक्रमात दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असा युक्तिवाद केला तसेच कांग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.

या प्रकारामुळे समस्त कांग्रेसीच्या भावना दुखावल्याने अर्णव गोस्वामी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष फैसल नागाणो यांच्या नेतृत्वात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी इर्शाद शेख, अनुराग भोयर, संदीप जैन, राजकुमार गेडाम यासह युवक कांग्रेस चे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


संदीप कांबळे कामठी