Published On : Fri, Apr 24th, 2020

पालकमंत्र्याच्या आदेशाची सर्रास अवहेलना

पुरवठा निरीक्षक संदीप शिंदेच्या शेफाळलाखोर पणा चा मनमानी कारभार शासन खिश्यात घेऊन चालण्याची प्रचिती, शिधापत्रिकेत नाव असूनही शिधापत्रिका धारक नसल्याच्या नावाखाली पुरवठा विभागाने केले धान्य वाटप


कामठी :-कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागु असलेल्या लॉकडाउन दरम्यान कुणीही अन्न धान्यापासून वंचित न राहावे यासाठी कामठी तालुक्यातील प्राधान्य तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजने सह प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजने अंतर्गत शिधापत्रिका वरील प्रत्येक सदस्यांना 5 किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचे आदेशीत करण्यात आले त्याचबरोबर पालकमंत्री ना नितीन राऊत यांच्या वतीने कामठी तालुक्यातील मजूर , शेतमजूर,रोजंदारीने काम करणारे मजदूर , मनरेगा मजदूर, रेड्डी ठेलेवाले, असंघटित कामगार, तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा गरजुना धान्य मिळावे यासाठी नगरपरिषद , नगरपंचायत तसेंच तसेच ग्रामपंचायत च्या वतीने गरजू लोकांची यादी बोलाविण्यात आली होतो यानुसार कामठी तहसील कार्यालय तर्फे 4914 लाभार्थ्यांना 24.50किलो ग्राम ची धान्य किट वितरीत करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच पालकमंत्री ना नितीन राऊत यांच्या वतीने विना शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाऱ्या या अन्न धान्य किट चा शुभारंभ नुकताच कामठी तहसील कार्यालयातुन करण्यात आला यावेळी पालकमंत्री ना नितीन राऊत यानो शिधापत्रिका धारक नसलेला कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत स्पष्ट बजावण्यात आले तसेच या वितरण कामात हयगय तसेच अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची एक प्रकारची धमकीवजा सुद्धा करण्यात आली तरीसुदधा पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यानो पालकमंत्री ना नितीन राऊत च्या आदेशाला केराची टोपली दाखवून आदेशाची सर्रास अवहेलना करीत खरया गरजू असलेले व शिधापत्रिका धारक नसलेल्या बहुतांश लाभार्थ्यांना बाजूला सारून शिधापत्रिकेत नाव असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत स्वतःच्या भ्रष्ट कर्तव्यदक्ष पणाचा प्रचिती देत असल्याने पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांचा शेफाळलाखोर पणा चा मनमानी कारभार शासन स्वतःच्या खिशात घेऊन चालत असल्याचे दिसून येत असल्याने या प्रकारामुळे शासनाचे खरे लाभार्थी उपाशी व भ्रष्ट मात्र तुपाशी असे दिसून येत आहे.

पालकमंत्री ना नितीन राऊत च्या वतीने अत्यंत गरजू व शिधापत्रिका धारक नसलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळावे यासाठी कामठी तहसील कार्यालय ला जवळपाड 4 हजार 914 अन्न धान्य कीट प्राप्त झाले होते या प्रत्येक किट मध्ये तांदूळ 10 किलो, गहू 10 किलो , साखर 1 किलो, तूर दाळ 1 किलो, खाद्य तेल 1 लिटर, हळद 250 ग्राम यासारखे जीवनावश्यक वास्तूचा समावेश आहे यानुसार लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातून नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत कडून संबंधित नगरसेवक, ग्रमपंचायत सरपंच कडुन यादी बोलवन्यात आली मात्र यातही लोकप्रतिनिधी नि या वैश्विक महामारीत सहकार्य करीत देशसेवाची भावना बाजूला सारून यातही राजकीय फायदा अंगिकरून जवळचे असलेले मतदारांना हाताशी धरून विश्वासपूर्ण असलेले लाभार्थ्यांचे नाव देण्यात आले या नावाची चौकशी करण्याचे अधिकार हे पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे होते यांच्या चौकशी अहवाला नुसार शिधा पत्रका धारक नसलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळवुन देने अपेक्षित होते मात्र या पुरवठा निरीक्षकाणे एखाद्या खुनात आपले हात रक्ताने माखवुन घेतल्यासारखे या कोविद लढाईत कोरोना योद्ध म्हणूंन देशसेवा साकार करणारे सैनिक देशद्रोहाची भूमिका साकारून ज्यांचे शिधापत्रिकेत नावे आहेत अशा बहुतांश लाभार्थ्यांना शिधापत्रिका धारक नसल्याचे प्रमाणित करून या मोफत अन्न धान्य किट चा लाभ मिळवून देत आहेत तेव्हा या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाणे शहानिशा करून संबंधीत दोषी अधिकाऱ्यावर निलनबनाची कारवाही करून देशद्रोह करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील जागरूक नागरिक करोत आहेत.


मुख्याधिकारी रमाकांत डाके:-नगर परिषद तर्फे मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांची यादी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आली होतो यासंदर्भत अन्न धान्य पुरवठा विभागा कडून शिधापत्रिका धारक असल्या नसल्याची चौकशी करून यादी मंजुर करून पाठविण्यात आली त्यानुसार नगर परिशद ला प्राप्त मंजूर धान्याची किट वितरित करण्यात आली आता त्यातही शिधापत्रिका धारक असूनही या धान्याची उचल केली असेल तर त्यांनी शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल.

संदीप कांबळे कामठी