Published On : Fri, Feb 16th, 2018

मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे युवक काँग्रेसचे शृंखलाबद्ध आंदोलन सुरूच व युवक काँग्रेसचा रस्ता-रोको : गुन्हा दाखल करण्याची मागणी

Advertisement

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे.आज उत्तर नागपूर मध्ये युवक काँग्रेसने बाईक रॅली काढत मोहन भागवतांच्या निषेध करीत नारे निदर्शने करीत रॅली संपूर्ण उत्तर नागपुरातुन भीम चौक बेझनबाग कमाल टॉकीज परिसरात काढली संपूर्ण उत्तर नागपूर दणदणून गेले. रॅली निषेध करीत कमाल चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आली. व परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे नारे देण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. नागपूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके जेष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांच्या मार्गदर्शनात व नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव सुशांत सहारे यांच्या नेतृत्वात कमाल चौकातिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन नारे, निदर्शने करून निषेध सभा घेण्यात आली.त्यानंतर युवक काँग्रेसने रस्तारोको आंदोलन केले.

लोकांनी स्वतःहुन या रस्तारोको ला आपली सहमती दर्शविली मोहन भागवताप्रति नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. नागरिकांनी प्रतिक्रिया देऊन भागवत यांचा निषेध केला.नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके म्हणाले की सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले घातक विधानामुळे देशातील शहिद झालेल्या सैनिकांचा व त्यांच्या परिवाराचा,सैन्याचा व देशातील नागरिकांचा अपमान करून सैन्याचे मनोधैर्य खच्ची केले. सैन्य आपले जीव धोक्यात टाकून देशाचे व देशातील नागरिकांचे रक्षण करतात रक्षण करतात त्यांचा झालेला अपमान आम्ही युवक काँग्रेस सहन करणार नाही. कमाल चौकातून शेकडो कार्यकर्त्यांसह नगरसेवक बंटी शेळके,नगरसेवक संदीप सहारे निषेध मार्च करीत नारे-निदर्शने करीत पाचपावली पोलीस स्टेशन येथे दाखल झाले.याचे कारण काल युवक काँग्रेसचे आंदोलन व निषेध मार्च दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून आज पाचपावली पोलीस स्टेशन वर निषेध मार्च काढण्यात आला. आमचा पोलिसांना विरोध नाही पण त्यांच्यावर जो राजकीय दबाव आहे त्याला एक चोख उत्तर आहे.

बंटी शेळके व संदीप सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. आर.एल.दुबे यांना भेटले व मोहन भागवत यांच्या विरोधात सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी,सैन्याचा अपमान देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी व समांतर सैन्य निर्माण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे भारतीय राज्यघटनेनुसार मोहन भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून लेखी तक्रार पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली गुन्हा दाखल झाला नाही तर युवक काँग्रेस आपले भागवतां विरोधात शृंखलाबद्ध आंदोलन सुरूच ठेवेल.

आजच्या आंदोलनात नगरसेवक संदीप सहारे, महासचिव सुशांत सहारे, प्रदेश काँग्रेस कमेटी लीगल सेलचे सदस्य ऍड. सुधाकर लिहिपाडे, शहर काँग्रेस कमेटी चे लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. अभय रणदिवे, सेवादल चे संघटन सचिव बबनराव दुरुगकर, राकेश बहिरीसाल,प्रवीण सहारे, राजन ठाकरे, अमोल गेडाम, अक्षय घाटोळे, आशु घरडे, मोंटी रामटेके, तौफिक भाई, शुभम बहिसारे, संदीप मटके, गौतम खडारे,बाबू खान, कोसीन सिद्दीकी, गोलू मेश्राम, राहुल चव्हाण, अक्षय हेटे, अंकुश लांजेवार, राज बोकडे, प्रफुल इजनकर,फजळुर कुरेशी, वसीम शेख, शेख अझर,अंकित गुंमगावकर, स्वप्नील ढोके, फरदिन खान, शानु राऊत, इरफान शेख, नकील अहमद, हर्षल हजारे, स्वप्नील बावनकर,हेमंत कातुरे, आशिष लोणारकर, विलास डांगे, सागर चव्हाण, विजय मिश्रा,राहुल मोहोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.