Published On : Thu, Sep 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बंदुकीचा धाक दाखवत पंचपावलीत लूट; तरुणाला मारहाण, दोघांना अटक

Advertisement

Nagpur Panchpaoli Robbery: 2 Held With Air Gun, Cash Recovered

नागपूर : पंचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीसारखी दिसणारी एअरगन दाखवून तरुणाला धमकावत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी तरुणासोबत शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून दोघे दुचाकीवरून फरार झाले. या प्रकरणी पंचपावली पोलिसांनी सोमेश मर्सकोल्हे आणि सागर येटी या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पंकज कुकडे मेहंदीबाग पॉवर हाऊस चौकाजवळील जयस्वाल देशी दारू दुकानासमोर गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यासोबत विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर घरी जात असताना दोन्ही आरोपी पुन्हा त्याच्या जवळ आले. सोमेशने एअरगन काढून त्याला धाक दाखवला, तर सागरने त्याच्या शर्टच्या खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेनंतर पंचपावली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. चौकशीत आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोमेशकडून लुटीतील रोख रक्कम, एअरगन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींविरुद्ध पंचपावली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात हत्या, मारहाण आणि लुटीसह गंभीर स्वरूपाचे सुमारे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पंचपावली पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.