नागपुर: नागपुरच्या मानकापूर पोलिसांनी ड्रग्सच्या व्यवहारात गुंतलेल्या एका युवकाला अटक केली आहे. आरोपी एका हॉटेलच्या खोलीत एमडी ड्रग्सची विक्री करत होता, जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलीसांच्या माहितीनुसार आरोपी तापसकुमार अनूपकुमार शर्मा, जो झिंगाबाई टाकली येथील गोविंद अपार्टमेंटचा रहिवासी आहे, संत ज्ञानेश्वर नगरातील वेस्टन हॉटेलच्या खोली क्र. 202 मध्ये ड्रग्स विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच पोलीसांनी हॉटेलवर छापा टाकला. तलाशी घेतल्यावर आरोपीच्या ताब्यातून २२ हजार रुपयांच्या ड्रग्स एमडी आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून ड्रग्स कोणाकडून मिळत होत्या आणि कोणाला विकत होत्या, याची चौकशी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की आरोपीचा शहरातील ड्रग माफियासोबत संबंध असू शकतो.