Published On : Sat, Oct 5th, 2019

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस करिता ‘आपली बस’ची सेवा

Advertisement

नागपूर: ६३व्‍या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची विशेष सेवा पुरविली जाणार आहे. ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठी ही विशेष बस सेवा सुरू राहील. शहरात दाखल होणा-या अनुयायांसाठी मनपातर्फे ही विशेष सेवा सुरू करण्यात येत असून नागपुरात येणा-या बौद्ध अनुयायांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

या मार्गावर मिळेल ‘आपली बस’ची सेवा

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत

दीक्षाभूमी ते अंबाझरी टी-पाईंट व परत

कपिलनगर ते दीक्षाभूमी व परत

नारा ते दीक्षाभूमी व परत

नागसेनवन ते दीक्षाभूमी व परत

यशोधरानगर ते दीक्षाभूमी व परत

आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत

रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत

भीम चौक ते दीक्षाभूमी व परत

वैशाली नगर ते दीक्षाभूमी व परत

राणी दुर्गावती नगर ते दीक्षाभूमी व परत

गरोबा मैदान ते दीक्षाभूमी व परत

Advertisement
Advertisement