Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रेमसंबंधातून तरुणीच्या वडिलांचा प्रियकरावर जीवघेणा हल्ला

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी परिसरात प्रेमसंबंधातून वाद चिघळून एका २३ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणावर तिच्या वडिलांनी लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा, तसेच ऑटो रिक्षाने धडक देत गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारे कॉलनी येथे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमी तरुणाची ओळख जमशेर उर्फ जम्मू मुनीर खान (वय २३, रा. जुनी खलाशी लाईन, कामठी) अशी झाली आहे.

जमशेरचे आरोपीच्या २२ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी रात्री तो तरुणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या वडिलांनी घरातील लाकडी दांडक्याने जमशेरच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी जमशेर तेथून पळून गेला. मात्र आरोपीने ऑटो रिक्षातून त्याचा पाठलाग करत त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

जखमी अवस्थेत जमशेरने आपल्या भाऊ गुलशेर खान याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.