Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खर्ऱ्याच्या व्यसनामुळे घरात वाद; विष प्राशन केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisement

नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिगडोह परिसरात खर्रा खाण्याच्या व्यसनामुळे कुटुंबीयांशी वारंवार होणाऱ्या वादातून मानसिक तणावात आलेल्या ६५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याने विष प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृताचे नाव शिवचरण (वय ६५) असे असून ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. ते कुटुंबासह दिगडोह येथे वास्तव्यास होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवचरण यांना अनेक वर्षांपासून खर्रा खाण्याचे व्यसन होते. या व्यसनाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने कुटुंबीय त्यांना वारंवार खर्रा सोडण्याचा सल्ला देत होते. मात्र, याच कारणावरून घरात सातत्याने वाद होत होते. या सततच्या वादामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. चार दिवस उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, विष प्राशन करण्यामागील नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.