Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : नंदनवन परिसरात प्रेमसंबंधातून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आश्वासन देत एका तरुणीसोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप एका युवकावर करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणीची २०२३ मध्ये एका खासगी कंपनीत नोकरीदरम्यान ३४ वर्षीय हर्षद शंकरराव मनोहर याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले. त्यावेळी तरुणीने तिचे वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याचे सांगितले होते. लवकरच पतीपासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दोघांनी एकमेकांना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर आरोपीने तरुणीची आपल्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. मात्र, घरच्यांनी या नात्याला विरोध दर्शविल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघे नंदनवन परिसरातील भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. दरम्यान, २०२४ मध्ये तरुणीचा घटस्फोटही झाला.

तक्रारीनुसार, घटस्फोटानंतरही आरोपी वारंवार लग्नाचे आश्वासन देत राहिला आणि त्याच विश्वासावर शारीरिक संबंध ठेवत राहिला. मात्र, लग्नाबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यानंतर तरुणीने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Advertisement

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.