अमरावती : एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 ऑगस्ट 2026 पासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तारखेनंतर स्मार्ट कार्ड नसलेल्या प्रवाशांना भाड्यातील सवलतीचा लाभ मिळणार नाही.
एसटी प्रवास अधिक आधुनिक, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत सुमारे 51 लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून 25 लाखांहून अधिक कार्डांचे वितरण पूर्ण झाले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील विविध भागांत 4 हजारांपेक्षा अधिक अधिकृत केंद्रांवर नोंदणी आणि कार्ड वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही केंद्रांकडून निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसटी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी 1 ऑगस्टपूर्वी जवळच्या बसस्थानकात किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन स्मार्ट कार्डसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. त्यामुळे सवलतीच्या प्रवासाचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहणार आहे.
Nagpur: 17 वर्षीय क्रिकेटर की मौत, VCA चयन नहीं होने का जिक्र...
आरक्षण सुधार की मांग को लेकर रैली #NagpurNews #ReservationPolicy #Protest #Rally #MaharashtraNews
Nagpur Central Jail Murder Case: दोषी को उम्रकैद #NagpurNews #CentralJail #Crime #Murder...
राष्ट्र सुरक्षा के समर्थन में मौन पदयात्रा #MaharashtraNews #NationalUnity #Constitution #Youth
Abhijit Dipke का BJP पर बड़ा आरोप | #MaharashtraNews #AbhijitDipke #BJP #AmitShah...
Amravati में सड़क हादसों पर बड़ा एक्शन #AmravatiNews #RoadSafety #TrafficRules #Helmet #FakeHelmet





