
मिळालेल्या माहितीनुसार, विक्की जनबंधु नावाचा दुकानदार भजी विक्रीसाठी कढईत तेल तापवत होता. त्याचवेळी प्रशांत मसुरके हा मद्यधुंद अवस्थेत भजी मागण्यासाठी दुकानाजवळ आला. मात्र तोल जाऊन तो थेट गरम तेलाने भरलेल्या कढईत पडला. या दुर्घटनेत तो गंभीर भाजला.
स्थानिक नागरिक व दुकानदारांनी तत्काळ त्याला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत रामटेक पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.









