Published On : Tue, Jun 22nd, 2021

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे योग दिन साजरा

नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काटोल रोड येथील शासकीय मुलीचे वसतिगृहात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अभिजित देशमुख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
प्राधिकरणाच्या सदस्या ॲड. अर्चना बोरकुटे यांनी यावेळी योगाबाबत माहिती दिली. शारिरीक मानसिक आरोग्य करीता योग असल्याचे सांगितले.

संस्थेतील उपस्थित 30 किशोरवयीन मुलींनी योगाचे प्रात्याक्षिक करून दाखवले. संस्थेच्या अधिक्षीका अंजली निंबाळकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.