Published On : Fri, Jul 26th, 2019

पोरवाल महाविद्यालयात योग आणि मेडिटेशन कोर्स सुरू

Advertisement

कामठी :-स्थानिक एस के पोरवाल महाविद्यालयात कामठी येथे योगा व मेडिटेशन कोर्स सुरू करण्यात आला आहे.एक महिना या कोर्सेचे प्रशिक्षण चालणार आहे.या प्रमाणपत्र कोर्स चे उदघाटन कामठी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री देविदास प्रभाकर कत्ताडे यांनी केला.

उदघाटनिय भाषण करताना त्यांनी योगाचे दैनिक जिनवणातील महत्व विशद केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी बागडे यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्व सांगताना योगा हा विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक वर्गानी देखील करायला पाहिजे,असे प्रतिपादन केले.

या कोर्स से संयोजक डॉ जयंतकुमार रामटेके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून योगा कोर्स से उद्देश व महत्व स्पष्ट केले.या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ ए एच अन्सारी,उपप्रचार्या डॉ रेणू तिवारी आणि संयोजन समितीचे कोषाध्यक्ष डॉ जितेंद्र तागडे, प्रवीण अंबाडे, महेश इरपाते, योगा कोर्स चे प्रशिक्षक प्रिया बडोडिया, सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ इंद्रजित बसू यांनी तर आभार प्रा.मल्लिका नागपुरे यांनी केले.

संदीप कांबळे कामठी