Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 17th, 2019

  काँग्रेस समर्थित येरखेडा ग्रापंच्या सरपंचासह हजारो कार्यकर्ते भाजपात पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास

  नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतचे काँग्रेस समर्थित सरपंच मंगला कारेमोरे सह सदस्य, माजी सरपंचासह हजारो कार्यकर्त्यांनी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला.

  कामठी तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी कळमना मार्गावरील संगेवार सभागृहात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नागपूर जिल्हा मेट्रो रिजनचे सदस्य व येरखेडा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मनिष कारेमोरे यांच्या नेतृत्वात येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे, सदस्य तरून घडले, पौर्णिमा बर्वे, मंगला पाचे, नागपूर जिल्हा युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत सहारे, गुमथळा येथील तुळजाभवानी महाविद्यालयाचे संचालक लीलाधर डाफ, रनाळा ग्रामपंचायतच्या सदस्य अनिता प्रभाकर नवलेसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.

  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरपंच मंगला कारेमोरे सह हजारो कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्योगपती अजय अग्रवाल, कामठी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रंजीत सफेलकर, कामठी विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल निधान, कामठी विधानसभा क्षेत्राचे विस्तारक मनोज चौरे, नरेश मोटघरे, मोबीन पटेल, कामठी तालुका भाजपा अध्यक्ष रमेश चिकटे, कामठी पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र गवते, योगेश वाडीभस्मे, जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संकेत बावनकुळे, कपिल गायधने, पंकज साबरे, मोहन माकडे, रनाला ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्ण साबळे, उपसरपंच आरती कुलकर, लिहिगावचे सरपंच गणेश झोड, नेरीचे माजी सरपंच डुंमदेव नाटकर, लतेश्वरी काळे उपस्थित होते.

  पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजले जाणारे ग्रामपंचायतच्या काँग्रेस समर्थक सरपंच मंगला कारेमोरे यांच्या सहा सदस्याने ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्याकरीता आपण येरखेडा ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असून आज आपण येरखेड्या अंतर्गत विविध विकास समाजाकरिता एक करोड 75 लाख रुपयांचा निधी देत असल्याचे जाहीर केले,आगामी एक वर्षानंतर येरखेडा रनाळा ग्रामपंचायत नगर परिषद होणार असून करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन येरखेड्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले. सरपंच मंगला कारेमोरे यांनी सरपंच निवडणुकीदरम्यान नागरिकांना विकासाचे आश्वासन दिले होते, ती आश्वासन पूर्ण करण्याकरिता आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश मोटघरे यांनी केले संचालन पंकज साखरे यांनी केले व आभार प्रदर्शन मनीष कारेमोरे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145