Published On : Sat, Sep 7th, 2019

येरखेडा रणाळा लवकरच नगरपंचायत मध्ये समावेश होणार :-पालकमंत्री

कामठी :-, सन 1997 मध्ये माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू करण्यास रनाळा गावकऱ्यांचे फार मोठे सहकार्य आहेत त्यामुळे रनालळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नसून येरखेडा रणाळा हे दोन्ही गावे लवकरच ग्रा प मधून नगरपंचायत मध्ये समावेश करणार असल्याचे मौलीक प्रतिपादन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रनाळा ग्रामपंचायत च्या वतीनेआयोजित विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले

विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दिपप्रवजलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी कामठी पंचायत समितीच्या माजी उपसभापती विमल साबळे ,उद्योगपती अजय अग्रवाल, कामठी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अनिल निदान उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपत्ते तहसीलदार अरविंद हिंगे, खंडविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,कामठी पंचायत समितीच्या सभापती अनिता चिकटे उपसभापती देवेंद्र गवते ,रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच सुवर्ण साबळे उपसरपंच आरती कुलकर्णी येरखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच मंगला कारेमोरे नागोराव साबळे, कामठीशहर भाजपाध्यक्ष विवेक मगतानी पंकज सांबरे, खसाल्याचे सरपंच रवी पारधी,खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे , अरुण पोटभरे,मोहन माकडे कोविद तळेकर श्रावण केलझरकर उपस्थित होते

Advertisement

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले सन 1997मध्ये मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा असताना रणारा गावच्या गावकऱ्यांनी मला मोठ्या प्रमाणात मतदान करून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात सुरुवात करण्यास मोठे सहकार्य केले आहे त्यामुळे रनाला गावाचा सर्वाणगीन विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धत करून देणार आहे,ज्या नागरिकां कडे पक्के घर नाही त्यांनी पंतप्रधान आवास योजना,,प्रधानमंत्री आयुष्यमानयोजनेचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घावा, कामठी रनाला कळमना मार्गावर कळमना मार्गाने पथदिवे लावण्यात येणार असल्याचे सांगितले,सोबतच सिमेंट रोड नाल्या बाधकामासा निधी देणार असल्याचे सांगितले

Advertisement

येत्या जानेवारी महिन्यात येरखेडा रनाला नगरपंचायत होणार असून नरपंचयत च्या माध्यमातून येरखेडा रनाला गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे जाहीर केले कार्यक्रमादरम्यान पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते रनाला येथे नव्याने बांधकाम करणाऱ्या 24 कोटी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण , सिमेंट रोड, सिमेंट नाली बांधकाम, स्मशान भूमी विविध बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सुवर्णा साबळे यांनी केले संचालन पंकज साबळे यांनी केले व आभार प्रदर्शन आरती कुलकर् यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement