Published On : Sat, Sep 7th, 2019

शाळेत अडकलेल्या के जॉन पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांची यशस्वी सुटका

Advertisement

विद्यार्थ्यांना वेठीस धरलेल्या के जॉन स्कुल वर कारवाही होणार का?

कामठी :-कामठी तालुक्यातील आसोली गावातील के जॉन पब्लिक स्कुल चे विद्यार्थी आज झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या अतिवृष्टीत शाळेसमोरील मुख्य मार्गावर झालेल्या पावसाच्या पाण्याचा पुरसदृश्य वेढा असल्याने स्कुल बस पोहोचणे शक्य होत नव्हते तसेच विद्यार्थ्यांनाही या पाण्यातुन जीव ओलांडणे हे धोक्याचे असल्याने शाळेतील विद्यार्थी शाळेतच अडकले होते. कित्येक वेळा होऊनही विद्यार्थी नियोजित वेळेवर घरी न पोहोचल्याने चिंतीत पालकांनी संपर्क साधला असता सदर परिस्थिती निदर्शनास येताच पालकांनी केलेल्या प्रयत्नातून तसेच स्थानिक नागरिकाणी दाखविलेल्या माणुसकीच्या धर्मातून मानवी साखळी तयार करीत विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन बाहेर काढले तसेच वेळीच पोहोचलेल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे विद्यार्थी सुखरूप शाळेबाहेर आल्याने चिंताग्रस्त पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली.ही घटना सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आली.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र 6 सप्टेंबर ला महालक्ष्मी पूजन निमित्त शासकीय सुट्टी असूनही सदर शाळेच्या व्यवस्थापका कडून शाळा सुरू ठेवण्यात आली परिणामी या शाळेतील विद्यार्थ्यांना तासंनतास उपाशी पोटी राहावे लागले सुदैवाने पुरसदृश्य पाणी थोडे कमी ओसरताच विद्यार्थ्यांना कसेबसे मानवी साखळी ने बाहेर काढण्यात आले.तेव्हा या प्रकारातून विद्यार्थ्यांना वेठीस धरलेल्या के जॉन शाळेवर शिक्षण विभाग कारवाही करणार का?याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

प्राप्त माहितीनुसार आसोली येथिल के जॉन पब्लिक स्कुल मध्ये नर्सरी ते 10 वि पर्यंत चे विद्यार्थी शिक्षण घेत असून दौनंदिनरित्या आज शालेय विद्यार्थी नियोजित वेळेवर सकाळी पोहोचले दरम्यान सकाळी साडे अकरा नंतर झालेल्या मुसळ धार पावसमुळे अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाल्याने परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली तसेच या शाळेसमोरील मुख्य मार्ग तसेच सभोवतालचा परिसर हा पुरसदृश्य पाण्याने वेढुन गेल्याने या मार्गाने शाळेत नियमित जाणारे शालेय वाहने पोहोचणे शक्य होत नव्हते तर शाळेच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच सुरक्षित थांबवले होते तर दुसरीकडे बराच वेळ होऊनही नियोजित वेळेवर पोहोचणारे विद्यार्थी घरी न परतल्याने पालकांनी शाळेसमोरील या पुरसदृश्य पाण्यासमोर एकच गर्दी केली ही वार्ता हवेसारखी पोहोचताच त्या आसोली गावातील स्थानिक नागरिक, पालक वर्ग तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या प्रयत्नातून गावकरी मंडळी नि मानवी साखळी तयार करीत शाळेतील तबबल 1600 विद्यार्थ्यांना या पुरसदृश्य पाण्याबाहेर सुखरूप काढले यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, मौदा चे पोलिस निरीक्षक यांनी सुद्ध उपास्थिती दर्शवून कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Advertisement
Advertisement