Published On : Fri, Sep 3rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

यंदा पोळा भरणार नाही; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Advertisement

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात यंदा मोठा आणि तान्हा पोळा भरणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (This year the Pola festival will not be celebrated; Order issued by Nagpur District Collector)

पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक रित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Gold Rate
29 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,14,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भावासाठी शासनाने केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यानी कळविले आहे.

Advertisement
Advertisement