संवाददाता/शाकीर अहेमद
यवतमाळ। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन संपुर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. मंत्र सुखी संसाराचा, दोन मुलांमध्ये तीन वर्ष अंतराचा हे यावर्षीचा जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे घोषवाक्य असून या घोषवाक्यानुसार विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
लोकसंख्या दिनानिमित्त दिनांक 10 जुलैपर्यंत दांपत्य संपर्क पंधरवाडा दिनांक 11 ते 24 जुलै दरम्यान लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्यास कुटुंब आरोग्य मेळावा पंधरवाडा असे संबोधण्यात येणार आहे. दांपत्य संपर्क पंधवाड्यानिमित्त कुटुंब पाहणी संरक्षण होईल. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पध्दती व सेवा याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.
लोकसंख्या स्थिरता पंधरवाड्यानिमित्त विशेष आरोग्य शिबीरे, कुटुंब नियोजन पध्दतीचे प्रदर्शन, प्रजनन व .बाल आरोग्य कार्यक्रम, लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्याबाबत समुपदेशन, आरोग्य सुविधांचे फलक, भिंतीपत्रके प्रदर्शित करणे, माहिती पत्रकांचे वाटप, कुटुंब आरोग्य मेळावा आदी कार्यक्रम घेतले जातील, असे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Representational Day