Published On : Wed, Jul 22nd, 2015

यवतमाळ (पुसद) : नॉरमल पेशन्ट रेफर टु यवतमाळ !

Advertisement


पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रतापाचा एक कलमी कारभार

Wasantrao Naik Government College of Medicle
पुसद (यवतमाळ)।
पुसदच्या शहरातील व ग्रामीण नागरीकांसाठी सर्वात मोठा उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांची चाचणी केली असता साधा ताप जरी आला तरी त्याला यवतमाळ ला हलविल्या जाते. मग पुसदचे उपजिल्हा रुग्णालय कोणासाठी असा प्रश्न जन सामन्यांना कडून निर्माण होत आहे.

ग्रामीणसह शहरी भागातील नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचीत राहू नये म्हणून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णालय बांधण्यात आले. या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्वतःची जबाबदारी झटकून येणार्या रुग्णास उपचार न करता त्यांना सरळ यवतमाळ येथे पाठवण्यात येते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून डॉक्टरांप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 7 वाजताच रुग्णांची गर्दी वाढत जाते. त्यानंतर दुपारी 3 वाजताची वेळ असतांना 4.30 वाजता डॉक्टर रुग्णालयात दाखल होतात. या प्रकारामुळे नागरिकांना नाहक तासंतास संबंधित डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागत आहे. डॉक्टर 5 वाजले कि एक क्षण थांबत नाहीत. जर एकदा रुग्णाची तबियत खराब झाल्यास त्यांना स्वतःच्या खाजगी दवाखान्यात रुग्णांस उपचारासाठी घेऊन जातात. या सर्व गैर प्रकाराकडे संबंधीत उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

खोकला किंवा शिंकल्यास रेफर टु यवतमाळ
संबंधीत डॉक्टरांकडे रुग्ण उपचारासाठी आल असता. उपचारा दरम्यान खोकला किंवा शिंकला तर त्या रुग्णावर चिडण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अश्या रुग्णांकडून संबंधित डॉक्टरांच्या तबियतीवर परिणाम होऊ नये म्हणून त्याला हातही लावत नाही. त्यांना थेट यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात भर्ती होण्याचा सल्ला देतात. मग पुसदचे डॉक्टर तपासण्या करतात तरी कोणाच्या या विवेचनात रुग्ण फसलेले आहे.

रुग्णालयात सोयीचा अभाव
उपजिल्हा रुग्णालयात शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी रुग्णाची गैर सोय होत असून शौचालयाचा वास परिसरात पसरला आहे. त्यामुळे या शौचालयात एक मिनिटही थांबू वाटत नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. सोबतच परिसरात रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळच असलेल्या हॉटेलमध्ये रुग्णाला जाऊन पाणी आणावे लागत आहे. या सर्व गैर प्रकारावर संबंधित विभागाचे अधिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

जर असा गैर प्रकार होत असेल तर डॉक्टरांवर वॉच ठेऊ
संबंधित डॉक्टरांच्या हजेरी साठी फिंगर मशीन लावण्यात आली आहे. जर संबंधीत डॉक्टर अंगठा मारून गप्पा मारत बसलेला आढळल्यास कारणे दाखव नोटीस बजावून व रुग्णावर चिडत असेल तर संबंधीत डॉक्टरांची चौकशी करून कार्यवाही करू. असे जगदीश सूर्यवंशी, अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय पुसदनी सांगितले.

Advertisement
Advertisement