Published On : Tue, Sep 28th, 2021

यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून, स्थानिकाकडून बचावकार्य सुरु

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथल्या दहागावजवळ एसटी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एसटीमध्ये चार ते सहा प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी उमरखेडवरून पुसदला जात होती. रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहागावच्या पुलावर पाणी आलं होतं. असं असतानाही एसटी ड्रायव्हरने नको ते धाडस करुन बस पाण्यातून रेटली आणि अपघाताची ही घटना घडली.

Advertisement

सध्या स्थानिकांकडून बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी, कडेंक्टर आणि ड्रायव्हर यांनी आता टपाचा आधार घेतला असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement

ही बस उमरखेडवरून पुसदला जात होती. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली आहे. पुलावर पाणी असल्यास वाहतूक करु नये असं सातत्याने आवाहन करण्यात येत असलं तरी या एसटी चालकाने अती धाडस करुन ही एसटी पाण्यात घातली आणि हा अपघात घडला. नाल्याच्या दोन्ही दिशेला पाणी असताना एसटी चालकाने हा प्रताप केला.

Advertisement

अतिउत्साही ड्रायव्हरने ही बस पुराच्या पाण्यातून रेटली. त्यामुळे ही बस वाहून गेली. सध्या ही बस एका ठिकाणी अडकली असून त्यातील प्रवाशांनी बसच्या टपाचा आधार घेतला आहे. ते मदतीची याचना करत असून स्थानिक प्रशासनाने युवकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केलं आहे.

बस चालकाच्या अतिउस्ताहीपणाचा फटका या प्रवाशांना बसला असून त्यांचा जीव वेठीस धरला गेल्याचं दिसतंय. सध्या या ठिकाणी एनडीआरएफचं पथही पोहोचलं असून त्यानीही बचाव कार्य सुरु केलं आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement