Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

यशोधरानगरमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ४०० किलो गोमांस जप्त

१० जिवंत गोवंशांची सुटका
Advertisement

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलखाना आणि गोमांस विक्रीविरोधात मोठी कारवाई करत योगी अरविंदनगर परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ४०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साहित्ये जप्त करण्यात आली असून १० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. तपासादरम्यान घरामध्ये अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४०० किलो गोमांस, ज्याची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये आहे, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्या.

Gold Rate
Aug 8 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,400 /-
Gold 22 KT ₹ 1,40,400 /-
Silver/Kg ₹ 2,31,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर पोलिसांनी शेजारील बंद खोलीची तपासणी केली असता तेथे १० जिवंत गोवंश आढळून आले. सर्व जनावरांची सुरक्षित सुटका करून त्यांना नियमानुसार संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ५ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी मोहम्मद अदनान हारून कुरेशी (वय २२) आणि रमजान बेग रशीद बेग (वय २३) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध व्यवसायामागील इतर आरोपी आणि संपूर्ण साखळीचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
Advertisement
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam #apkscam #news

KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack  #CrimeNews #MaharashtraCrime

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha #newsupdate #news

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges