Published On : Thu, Sep 19th, 2019

यामिनी बंडू देवकर महिला शहर अध्यक्षपदी निवड

नागपूर : राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी यामिनी बंडू देवकर वैशाली नगर नागपूर यांची महिला शहर अध्यक्ष पदी नुकतीच निवड केली आहे. यामिनी देवकर यांची समाजाप्रती भावना, माणूसकी, सन्मान , मेहनत, राजकीय पक्ष, राष्ट्रीय किसान आघाडी बहुजन पार्टीच्या वतीने त्यांना लढण्याची प्रवृत्ती, अन्यायाविरूद्ध आणि मूलभूत हक्क, मिळविण्याकरीता, जनतेचे विचार विश्वासात घेऊन आणि कुशल कार्या करिता, समाजसेविकां म्हणून त्यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीत, महिला शहर अध्यक्ष यापदावर नियुक्त करण्यात आले.