Published On : Mon, Jun 12th, 2017

‘फ्लाय ॲश वापरा’वर १३ जून रोजी कार्यशाळा


नागपूर: महाराष्ट्र शासनाने फ्लाय ॲश संदर्भात तयार केलेल्या पॉलिसीची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी आणि त्याच्या प्रचार-प्रसारासाठी नागपूर महानगरपालिका, महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड, सेटको (CETCO) आणि जिओ-टेक यांच्या वतीने उद्या १३ जून रोजी दुपारी ३ वाजता सिव्हील लाईन उद्योग भवनातील पहिल्या माळ्यावरील एमआयडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका आणि महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता या दोन्ही संस्था फ्लाय ॲश वापरासंदर्भात सोबत काम करणार आहे. त्याच्या प्रसारासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संयुक्त संचालक (उद्योग) जिल्हा उद्योग केंद्र ए.पी. धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती राहील. एमआयडीसीचे विभागीय अधिकारी जगदीश संगीतराव, एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस. आर. वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण नमंडळाचे विभागीय अधिकारी राहूल वानखेडे यांचीही यावेळी उपस्थिती राहील. कार्यशाळेत मनपा, नासुप्र, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व क्रेडाईचे प्रतिनिधी सहभागी होतील. महाराष्ट्र राज्य ॲश पॉलिसी डिसेंबर २०१६, रस्ता बांधकामात फ्लाय ॲशचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ्र मार्गदर्शन करतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement