| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 6th, 2020

  श्रमिक स्पेशल रेल्वे मुजफ्फरपूरसाठी रवाना

  नागपूर : लॉकडाउनमुळें नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच निवारागृहात असलेल्या 1008 नागरिकांना घेऊन नागपूर ते मुजफ्फरपूर विशेष श्रमिक स्पेशल रेल्वे आज साडेचार वाजता रवाना झाली.

  आपल्या गावी जात असल्याबद्दल उपस्थितांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले.

  श्रमिक स्पेशल रेल्वेमध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक 28, कळमेश्वर 75, नरखेड 18, उमरेड 105, सावनेर 41, नागपूर ग्रामीण 405, कुही 03, भिवापूर 04, मौदा 110, हिंगणा 87, कामठी 72, निवारागृह नागपूर 11 व उस्मानाबाद येथील 49 अशा एकूण 1008 नागरिकांचा यात समावेश आहे.

  मंडळ रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज तिवारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, स्टेशन डायरेक्टर दिनेश नागदेवे, वाणिज्य प्रबंधक एस.जी.राव, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, महापालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपविभागीय महसूल अधिकारी नीता पाखले चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.

  जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.

  ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत फुड पॅकेट ही देण्यात आले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145