Published On : Mon, Jul 15th, 2019

समाजाला दिशा देण्याचे कार्य करा -अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

भारत विकास परिषदेच्या नागपूर पश्चिम शाखेचा पदग्रहण सोहळा

नागपूर : प्रत्येक व्यक्तीच्या मनात देश व समाजासाठी कर्तव्याची भावना निर्माण करुन समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

Advertisement

रामनगर परिसरातील हेडगेवार रक्तपेढी येथील सभागृहात भारत विकास परिषदेच्या नागपूर पश्चिम शाखेच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

मंचावर भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुसे, नागपूर पश्चिम शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष अविनाश पाठक, जयप्रकाश गुप्ता, अनिरुध्द पालकर, सारीका पेंडसे, संजय गुळकरी, उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतात जन्माला आलेल्या महामानवांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले असून त्यांचे कार्य आपण पुढे नेऊन समाजाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन करुन श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या तत्वज्ञानाद्वारे देशाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांनी दिलेला विचार हा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे.

आज माणूस हा स्वतःपुरता जगतो, मात्र आपण आपल्या समाजातील इतरांचाही विचार करणे आवश्यक आहे. तेव्हाच देशाचा सर्वांगिण विकास शक्य होईल. त्यासाठी आपल्या समाजातील गरजू लोकांना आपण मदत करायला हवी, गरीबांची सेवा करायला हवी, तसेच आपला देश घडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात देशाच्या विकासाची भावना निर्माण करण्याचे कार्य या परिषदेने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पदग्रहण समारंभात भारत विकास परिषदेच्या नागपूर पश्चिम शाखेच्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांनी शपथग्रहण केली. कार्यक्रमात भारत विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement