Published On : Mon, Jul 15th, 2019

अ.भा. माळी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न….

ध्येयाची जिद्द व चिकाटी खडतर परिस्थीतही यशाचे शिखर गाठू शकते भाग्यश्री बनायात(भा.प्र.से)…

नागपूर : अखिल भारतीय माळी महासंघ, नागपूर द्वारे माळी समाजातील मेरीट विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि.14 जुलै 2019 रोजी, गुरूदेव सभागृह सुभाष रोड नागपूर येथे संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटक अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शंकरराव लिंगे होते. मुख्य अतिथी पाहुणे भाग्यश्री बानायत (भा.प्र.से ) संचालक, महाराष्ट्र राज्य रेशिम संचालनालय तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ या होत्या.अध्यक्षस्थानी माळी महासंघाच्या महानगर अध्यक्ष, मधुसुदन देशमुख तर विशेष अतिथी म्हणून महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष गोविंदराव वैराळे, प्रशांत वावगे वित्त व लेखाधिकारी वर्ग 1 व संजय नाथे अध्यक्ष रोजगार संघ नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी 260 गुणवंत विद्यार्थी व 2 (दोन ) मेरीट विद्यार्थीनींचा सत्कार, स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून मा.भाग्यश्नी बानायात भा.प्र.से यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला असून नागपूर विभागातून 10 वी मध्ये 98.60 % प्रथम मेरीट कु. साक्षी किशोर दिडपाये नागपूर या अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या विद्यार्थीनींचा भाग्यश्री बानायात हिच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच या प्रसंगी अॅग्रो प्लस फाऊन्डेशनचे अध्यक्ष गोविंदराव वैराळे यांचे तर्फे रुपये 5100 अक्षरी पाच हजार एकशे रू पुरस्कार राचा धनादेश देवून विशेष गौरव करण्यात आला.

तसेच अमरावती विभागातून १० वी मध्ये मेरिट आलेली कु.साक्षी चाहाकार 97:40 % हिचा सुद्धा विशेष गौरव करण्यात आला मा.भाग्यश्री बानायात भा.प्र.से यांनी ध्येयाची जीद्द व सतत चिकाटी खडतर परीस्थितीवर मात देवून यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकते. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साकार करण्याकरिता प्रयत्नशील असावे असे आव्हान केले प्रथम वर्ग अधिकारी प्रशांत बावगे पगार संघाचे संस्थापक संजय नाते यांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले माळी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष गोविंद वैराळे व प्राध्यापक आघाडीचे अध्यक्ष डॉ. विवेक भुसारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात कैलास जामगडे प्रदेश सरचिटणीस, शिवराम गुरनुले महानगर सरचिटणीस, रोहिणी पाटील प्रदेश महिला अध्यक्ष, वसुधा येनकर प्रदेश महिला सरचिटणीस, सुनिता शहाकार प्रदेश संघटिका, महानगर महिला अध्यक्ष, विणा बंड कोषाध्यक्ष, वृषाली ओम वैराळे उपाध्यक्ष, पत्रकार आघाडीचे अध्यक्ष देवराव प्रधान , कविता भोपळे प्रा.डॉ.विवेक भुसारी, प्रशांत निमकर,अनील भेदे, नरेंद्र मलकर , गोविंद ठाकरे गोपाळ बंड, सतीश भोपाळे, गोविंद तीतर, अशोक बनसोड, कपिल धुमाळे, विजय सोनुले फुलारी माजी पोलीस

सहआयुक्त. डॉ.प्रवीण सुंदरकर, प्रदिप मांदाडे, अरुण ढाकुलकर गणेश कडुकर, अशोक आंबेकर, दिपाली भेदे, मालती भेदे, वैशाली सुंदरकर युवा आघाडीचे स्वप्नील खडसे, अनिकेत गौरकर, समरितकर, स्वप्निल धवडे, कु. पूनक वाळके, कु. प्रणाली कडूकर, कुणाल भेदे, कु. प्रतीक्षा पोहणकर, कु. दिपाली भिवगडे, छाया तीतर, विता भेदे, राजश्री भेदे, गायत्री भुसारी, माया कामडे, कांचन वडतकर, इत्यादी माळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तसेच विद्यार्थी व त्यांचे पालकही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता माळी महासंघाचे प्राध्यापक शिक्षक आघाडी, युवा आघाडी व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या करीता विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक भुसारी तर संचालन प्रा. कविता भोपळे व डॉ.सौरभ निमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत राऊत यांनी मानले.