Published On : Tue, Oct 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून काम करा :प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

कोराडी येथे भाजयुमोमध्ये असंख्य युवकांचा प्रवेश.

कोराडी : राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदीची देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून प्रत्येक भाजपा कार्यकर्ता त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सरसावला आहे. भाजपामध्ये प्रवेश करणारे युवक राष्ट्रप्रेमाने भारावलेले असून त्यांनी राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून काम करण्याचा निर्धार केला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सावनेर विधानसभा क्षेत्रातील सिल्लेवाडा, चनकापूर व खापरखेडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज कोराडी येथील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपात प्रवेश घेतला. पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. भाजयुमोचे प्रफुल बागडे व सत्यम सिंग यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांचे पक्षात उज्जवल भविष्य असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, भारताला विश्वगुरू करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. जगातील १५५ देशांनी मोदीजींचे नेतृत्त्व मान्य केले आहे. भाजपा हाच देशात एकमेव असा पक्ष आहे की, जो मोदीजींच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सरसावला आहे. भाजपा राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून काम करीत आहेत. मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नरत आहे.

यावेळी भाजपा नागपूर ग्रा. जिल्हा उपाध्यक्ष सोनबाजी मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी निधान, सावनेर तालुका भाजयुमो महामंत्री आशिष फुटाने यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement