महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस व्दारे पेट्रोल, गँस भाववाढीचा विरोध
कन्हान: नागपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस व्दारे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांना तहसिलदार पारशिवनी मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली की , मागील काही दिवसामध्ये पेट्रोल, डिझेल,घरगुती सिलेंडर गैस च्या दरात आपल्या सरकारने सामान्य माणसाने कंबरडे मोडणारी दर वाढ केलेली आहे.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव अत्यंत कमी झालेले असतानाही आपल्या सरकारने केलेली दरवाढ आम्हाला मान्य नाही.ही भाववाढ कमी करण्यात यावी . अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. आपण टी.व्ही. चॅनलवर उज्वला गैस योजनेचा प्रचार केला कि चुलीमुळे महिलांना धुराचा त्रास होतो त्यामुळे त्यांचे आरोग्य खराब होते .आपल्या सरकारने उज्वला गैस योजने अंतर्गत काही महिलांना मोफत गैसचे वाटप सुद्धा केले. परंतु सिलेंडर भाव मागच्या सरकारच्या कार्यकालात ३७०/-रु.च्या आसपास होते ते आपल्या सरकारने ८५०/- रु. च्या घरात नेऊन ठेवले. सामान्य महिला या किमतीत महिन्याचा सिलेंडर खरेदी करू शकत नाही.
आपण महिलांना चुली बंद करण्यास सांगितल्या ,त्यांचे रॉकेल आपण बंद केले एवढ्या महागाचा सिलेंडर खरेदी करण्याची ताकद त्यांच्यात नाही अशा दृष्ट चक्रात महिला सापडल्या. डिझेल ,पेट्रोलचे भाव वाढविल्यामुळे भाडे वाढवले तर सामान्य माणसाची एस.टी. चा प्रवास महाग झाला, खाजगी जीपचाही प्रवास महागला त्यामुळे आता प्रत्येक वस्तूचे भाव वाढले. सर्वसामान्य माणसाचे जीवन आपण कठीणाईचे केले. हेच काय ते अच्छे दिन?
आम्ही राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे आपल्या सरकारचा निषेद करतो आणि विनंती करतो की आपण केलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडर गैसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. याप्रसंगी प्रमुख्याने महिला जिल्हा अध्यक्ष सौ. अर्चना विनोदराव हरडे , महिला तालुका अध्यक्ष सौ. सारिका प्रवीण शेलारे, रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोरजी बेलसरे तालुका अध्यक्ष गणेश पानतावणे , चंद्रशेखर पौनीकर , प्रवीण शेलारे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद हरडे , महिला जिल्हा उपाध्यक्ष शशिकला बागडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिता मानकर ,भारती वानखेडे . लीला बर्वे , विशाखा वानखेडे , शारदा दुधबावणे , सुनिता राऊत ,रत्नमाला भोयर , सविता बावनकुळे, ईश्वर उईके , सुरेश आबेधुके उपस्थित होते .